काळया बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदुळ पकडला

उस्मानाबाद – दिनांक 02.03.2019 रोजी 17.00 वा.सु. कुरणे नगरच्या पुढे चढावर मोठया टेकडीजवळ उस्मानाबाद येथे 1) प्रमोद धनराज शेरखाने 2) दीपक भारत कदम दोघे रा. देवी मंदीर उस्मानाबाद यांनी त्यांचे ताब्यातील आयशर टेम्पो क्र. एम.एच. 25 बी 7863 त्यामध्ये 107 तांदळाचे पोते पंजाब एफ.सी. चा शिक्का असलेला रेशनिंगचा तांदुळ कोठुनतरी आणुन कोठे तरी जास्त भावाने काळया बाजारात विक्रीसाठी घेवुन जात असताना मिळुन आले. त्यांचे ताब्यात आयशर टेम्पो क्र. एम.एच.25 बी. 7863 जु.वा.किं.अं 4,00,000/-रु. व त्यामध्ये 107 तांदळाचे पोते किं.अं. 1,60,500/- रु असा एकूण 5,60,500/- रु चा माल मिळुन आला म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 02.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे जीवन आवश्यक वस्तु कायदयाचे कलम 3 , 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांनी केली आहे.

admin

Read Previous

उस्मानाबाद येथे महिलेची फसवणूक

Read Next

सासरच्या त्रासास कंटाळून विवाहितेची आत्महत्या