उस्मानाबाद येथे महिलेची फसवणूक

उस्मानाबाद :- फिर्यादी सुनिता शिवाजी कोळी वय 55 वर्षे रा.आयुर्वेदिक कॉलेजच्या पाठीमागे ही दिनांक 01/03/2019 रोजी दुपारी 01 च्या सुमारास बँक ऑफ बडोदा हि तिचे खात्यावरील पैसे काढण्यासाठी गेली होती. तिला लिहिता वाचता येत नसल्यामुळे तिने बँकेतील एक अनोळखी पुरूष 26 वर्षे वयाचा याचेकडे तिने पैसे काढणेसाठीची स्लीप भरून घेतली. तिने खात्यावरील आठ हजार रूपये काढून घेतले त्यांनतर बँकेच्या बाहेर येवून आठ हजारापैकी चार हजार रूपये पॉकेटात ठेवले व राहिलेले चार हजार रूपये पिशवीमध्ये ठेवले. नंतर ती घराकडे जाण्यासाठी काळा मारूती चौकाजवळ पतंगे ड्रेसेस समोरून दुपारी 02 वाजता पायी जात असताना स्लीप भरून दिलेला अनोळखी इसम पिवळया रंगाचे स्कुटीवर तिच्याजवळ आला व माझे खात्यावरील पैसे चुकुन तुमच्या खात्यावर आले आहेत,अशी बताणी करून व ठकवणूक करून पिशवीतील चार हजार रूपये घेवून गेला आहे. अशी तक्रार सुनिता कोळी हिने दिल्याने अज्ञात आरोपीविरूध्द भांदविचे कमल 420 प्रमाणे पो.स्टे उस्मानाबाद शहर येथे दि.02/03/2019 रोजी गुन्हा नोंद झाला आहे.

admin

Read Previous

हाणामारी प्रकरणी चार पोलीस निलंबीत

Read Next

काळया बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदुळ पकडला