उस्मानाबाद पं. स. मध्ये महाराष्ट्र दर्शन प्रवास खर्चात घोळ

उस्मानाबाद – महाराष्ट्र दर्शन रजा सवलत प्रवास या बाबी अंतर्गत देयकाची माहिती सादर करण्याबाबत हलगर्जीपणा केल्यामुळे उस्मानाबाद पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक ( लेखा ) वाय.एस. शहापूरे यांची  एक  वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. 
महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना तीन वर्षातून एकदा राज्यात  कुठेही प्रवास करण्यासाठी रजा मंजूर केली जाते तसेच त्याने कुटुंबासह प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. त्यानंतर झालेल्या प्रवास खर्चापोटी अनुदान देण्यात येते. 
मार्च २०१५ ते २०१८ या कालावधीत उस्मानाबाद पंचायत समितीतील किती कर्मचाऱ्यानी महाराष्ट्र दर्शन रजा सवलत प्रवास बिले उचलली, किती जणांचे बिल पेंडिंग आहे याची माहिती आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी मागितली असता, ही माहिती वरिष्ठ सहाय्यक ( लेखा ) वाय.एस. शहापूरे यांनी वेळेत दिली नाही. त्यामुळे गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांची एक वार्षिक  वेतनवाढ रोखून तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले  आहेत.

admin

Read Previous

जवान बालाजी गुरव हल्ला प्रकरणी गुरव समाज आक्रमक

Read Next

उमरगा पोलीस ठाण्यात पोलिसांत हाणामारी, १ गंभीर जखमी