उमरगा पोलीस ठाण्यात पोलिसांत हाणामारी, १ गंभीर जखमी

उमरगा : जनतेच्या गुन्ह्याची नोंद करणाऱ्या उमरगा पोलिस ठाण्यातच शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी एका पोलिसास हत्याराने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.पोलिस अधीक्षक याप्रकरणी  काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.


या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , शहरातील पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक राजुदास सिताराम राठोड हे शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हे तपासकामी ठाण्यातच उत्तर बिट मधील खोलीत काम करीत असताना पोलिस ठाण्यातीलच लाखन गायकवाड, मयुर बेले,सिद्धू शिंदे या पोलीस कर्मचाऱ्यानी धारदार शस्त्राने व लोखंडी टौमिने मारहाण करत तुला जिवंत सोडनार नाही म्हणत जबर मारहाण केली. दरम्यान यावेळी चौथा पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर असल्याचे समजते. मारहाण गंभीर झाल्याने यात पोलिस नाईक राजुदास राठोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस ठाण्याच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांतच हाणामारी होते, मात्र या बाबत स्थानिक पोलिस अधिकारी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास अथवा बोलण्यास तयार नव्हते, या प्रकरणी शनिवारी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे विश्वासनीय वृत असून पोलिस अधीक्षक आर राजा घटनेबाबत काय पाऊले उचलणार ? हे पहावे लागेल.


पोलीस ठाण्यातच पोलिसामध्ये जबर मारहाण झाल्याने शहर व जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.


या गंभीर घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ठाण्यातील काही पोलिस समांतर कारभार चालवित असल्याची चर्चा असून त्यातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांतून बोलले जात होते.

admin

Read Previous

उस्मानाबाद पं. स. मध्ये महाराष्ट्र दर्शन प्रवास खर्चात घोळ

Read Next

सोसायटीच्या साठ बनावट सदस्यांचे सभासादत्व रद्द