कन्यादान !

आमची लाडकी कन्या कु. मयुरी हिचा शुभविवाह चि. समीर याच्याबरोबर गुरुवार दि.13 डिसेंबर रोजी उस्मानाबादच्या पुष्पक मंगल कार्यालयात मोठया थाटामाटात पार पडला.
मयुरी ही पुण्यात एसेंचर कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर चि. समीर हा मुंबईत आवेक्षा टेक्नॉलॉजीमध्ये टीम लीडर आहे.
चि. समीर याचे मूळ गाव परभणी असले तरी मुंबईत स्थायिक झाला आहे, मयुरी हिची बदली मुंबईतच जानेवारी अखेर होणार आहे. समीर ने उलवे तेथे नवीन प्लॅट घेतला आहे, ऐरोलीत मयुरीचे ऑफिस आहे, उलवे – आयरोली 20 मिनिटे अंतर आहे.मयुरी आता पुणे सोडून मुंबईत शिफ्ट होत असल्याने आम्हाला अधिक आनंद आहे.
चि. समीर याचा वाढदिवस 12 डिसेंबर ! मागील वर्षी याच दिवशी समीर हा आपल्या आईवडील, नातेवाईक यांना घेवून पुण्यात मुलगी पाहण्यास आला होता, त्यांनी लगेच पसंदी दिली होती, त्यानंतर उस्मानाबाद येथे मार्च महिन्यात लग्नाची तारीख फिक्स करण्यात आली आणि सुपारी फोडण्यात आली होती, तेंव्हापासून लगीनघाई सुरू झाली होती, 13 डिसेंबर अजून लांब आहे म्हणत तारीख जशी जशी जवळ येत गेली तसे धावपळ वाढली,
उस्मानाबाद येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले पुष्पक मंगल कार्यालय मालक अनिल नाईकवाडी अगदी माफक दरात दिले, फुलांचे डेकोरेशन काळ्या मारुती चौकातील गोरे यांनी अत्यंत आकर्षकरित्या केले, प्रभाकर जगदाळे यांचा वाद्यवृंद समूह लोकांचे मनोरंजन करत होते. पुण्यातील भटजी कुलकर्णी गुरुजी आणि उस्मानाबादचे भटजी निलेश गुरुजी यांनी सर्व विधी पार पडल्या.
वरातीसाठी उपळे येथील राजाभाऊ यांच्या मालकीचा घोडा आणि सिद्धेश्वर वडगाव येथील बँडने वऱ्हाडी मंडळीना डान्स करण्यास वातावरण तयार केले.
वेळेवर अक्षता पडल्या, विविध क्षेत्रातील मान्यवरानी हजेरी लावली ! सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. ज्यांनी या कार्यात मदत केली त्या सर्वांचा मी ऋणी आहे.
शेवटी मुलींला सासरी पाठवताना मनात काहूर तर डोळ्यात अश्रू येत होते पण ते दाबून ठेवले ! मयुरी बद्दलच्या सर्व आठवणी मनात दाटून येत होत्या ! मन गलबलून आले होते पण हसत हसत निरोप दिला ! मयुरी ढेपे आता मयुरी ढेपे – पोफाळकर झाली ! जावाई समीर पोफाळकर आणि त्यांची फॅमिली खूप चांगली आहे ! त्यामुळे मला मयुरीच्या भविष्याची चिंता नाही !
बाप म्हणून जे कर्तव्य आणि जबाबदारी होती ती सर्व पार पाडली आहे. माझ्यासोबत दीपा होती . मयुरीची देवकी गेली तरी यशोदा सोबत होती , त्यामुळे तिला आईची उणीव भासली नाही ! माझा प्रत्येक निर्णय बरोबर ठरला ! लेकीच्या सुखात आम्ही सुख मानले ! तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली ! तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आमच्या लाडक्या कन्येला समीर आणि त्याची फॅमिली सुखात ठेवणार, हा आमच्या मनात विश्वास आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या सोबत आहोतच… 😊
मयुरीचा वडील आणि समीरचा सासरा !! 😊

सुनील ढेपे

admin

Read Previous

दिंडेगाव प्रकरणात अखेर गुन्हा दाखल , पण गंभीर कलमे वगळली !

Read Next

हॅलो सर !