सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्यातील जवानांवर जीवघेणा हल्ला

तुळजापूर – सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्यातील जवानांवर काठ्या, कुऱ्हाडी आणि तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.  दिंडेगाव ता. तुळजापूर येथील चार ते पाच जणांनी शुक्रवारी रात्री 8 वाजता ‘तू आमच्या गल्लीत का आला ? अशी कुरापत काढून सैनिक बालाजी गुरव याच्यावर हल्ला केला आहे. त्यात गुरव गंभीर जखमी झाला असून, त्याच्या उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

देशाची सेवा करणारा भारतीय सैन्यातील जवान बालाजी गुरव एक महिन्याच्या सुट्टीवर दिंडेगावात आला आहे. त्याच्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजता चार ते पाच जणांनी हा अमानुष हल्ला केला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. 
दिंडेगाव येथे काही महिन्यापूर्वी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. त्याची धग अजूनही धुमसत आहे. मागील कुरापतीवरूनच हा हल्ला झाल्याचे गुरव याच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे.

गावात तणावाचे वातावरण असले तरी नळदुर्ग पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.

admin

Read Previous

उस्मानाबादेत पासपोर्ट कार्यालय सुरू

Read Next

दिंडेगाव प्रकरणात अखेर गुन्हा दाखल , पण गंभीर कलमे वगळली !