पैशाकरीता विवाहितेचा छळ

परंडा :-  दिनांक 25.03.18  रोजी 13.00 वा.सु. पिडीत फिर्यादी विवाहित महिला हिचे सासरी बार्शी येथे 1 ) फिरोज रशीद शेख 2) रशीद जिलानी शेख 3) सुहेल रशीद शेख 4) रशीद अजीज शेख व दोन महिला सर्व रा. आदर्शनगर बार्शी यांनी संगनमत करुन पिडीत विवाहित महिलेस आपल्याला नवीन कोल्ड्रींग व्यवसाय टाकायचा आहे व मोटार सायकल घ्यायची आहे, त्यासाठी तुझे आई-वडीलांकडुन दोन लाख रुपये घेवुन ये नाहीतर तुला नांदवणार नाही. तु दोन लाख रुपये आणले तरच तुला घरात घेवु असे म्हणुन पिडीत फिर्यादी  विवाहित महिलेस लाथाबुक्याने मारहान करुन रात्री अपरात्री घराबाहेर हाकलुन देवुन उपाशीपोटी ठेवुन सतत मानसिक व शारिरीक त्रास देवुन जाट हाट केला व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन पिडीत विवाहित महिलेच्या फिर्यादवरुन व मा. परंडा कोर्ट यांचे आदेशान्वये वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 21.02.19 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 498(अ),323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

admin

Read Previous

उस्मानाबाद येथे महिलेचा विनयभंग

Read Next

उस्मानाबादेत पासपोर्ट कार्यालय सुरू