चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

उस्मानाबाद – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकाच्या उस्मानाबाद  जिल्ह्याच्या बाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात तिघांच्या औरंगाबाद ग्रामीण तर एकाची बीड जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे

उस्मानाबाद आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील नेवसे आणि उमरगा पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक माधव गुंडीले यांची  औरंगाबाद ग्रामीण तर भूमचे पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांची बीड जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

admin

Read Previous

रेखा मोरे यांना औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा

Read Next

उस्मानाबाद येथे महिलेचा विनयभंग