उदतपुरची पूजा गायकवाड झाली उपजिल्हाधिकारी

लोहारा  –  घरची परिस्थिती हलाखीची असतानाही जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर दतपुर येथील पूजा तानाजी गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले असून त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे.तिच्या या यशाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे. उदतपूर गावातील तानाजी गायकवाड २० वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक झाले. तिन्हीही मुलीच असल्या तरी त्या मुलींना शिक्षणात काहीच कमी पडू द्यायचे नाही, असा गायकवाड यांनी निश्चय केला होता. त्यानुसार गायकवाड यांनी परिश्रम घेऊन मुलींना शिक्षण दिले. तानाजी गायकवाड यांच्या मोठ्या मुलीची स्पर्धा परीक्षा देऊन महसूल विभागात लिपिक पदावर निवड झाली. यामुळे अभ्यास केल्यानंतर नक्कीच यश मिळते असा विश्वास पूजा यांनाही मिळाला. त्यामुळे त्यांनी ध्येय निश्चित करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यास सुरू केला. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये झालेल्या राज्यसेवेच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन नायब तहसीलदारपदी निवड झाली. त्यातच सन २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी या पदावर त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. परिस्थिती हलाखीची असली तरी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश नक्कीच मिळते याचे हे एक आदर्श उदाहरण त्यांनी निर्माण केले आहे.

admin

Read Previous

मोबाईल चोरीची फिर्याद नोंदवून न घेणाऱ्या आनंदनगर पोलिसांना दणका

Read Next

शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा