उस्मानाबाद येथे घरच्यांच्या जाचास कंटाळुन आत्महत्या

उस्मानाबाद :- दिनांक 15.02.2019 रोजी व त्यापुर्वी दोन तीन महिन्यापासुन 1) दत्ता पांडुरंग काळे (नंदेचा पती) व ननंद दोघे रा. समता नगर उस्मानाबाद ,नंनंद रा. फिल्टर टाकी समोर उस्मानाबाद व सासु रा. विजय चौक जुनी गल्ली उस्मानाबाद यांनी गणेश रखमाजी मोरे (मयत) व त्यांची पत्नी यांना राहत असलेले खर प्लॉट नं. 17 फिल्टर टाकी जवळ, उस्मानाबाद शहरात राहते घरी येवुन घर खाली करुन देण्याचे कारणावरुन तसेच गाडी धंद्याचे पैशाचे कारणावरुन कुरापत काढुन मारहान व शिवीगाळ करुन मानसिक शारिरिक त्रास दिला त्यांचे त्रासास कंटाळुन गणेश रखमाजी मोरे (मयत) यांनी दिनांक 15.02.2019 रोजी 07.00 ते 07.30 वा.चे दरम्यान रॉकेल ओतुन घेवुन समता नगर उस्मानाबाद येथे पेटवुन घेतले त्यात ते 100 टक्के जळाल्याने दिनांक 19.02.2019 रोजी उपचारा दरम्यान मयत झाले आहेत. त्यांचे मरणास वरिल लोक जबाबदार आहेत म्हणून गणेश रखमाजी मोरे यांचे पत्नीचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 306,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

admin

Read Previous

उस्मानाबाद येथून 15 वर्षीय मुलास पळवुन नेले

Read Next

१६ लाखाची ठेव परत न मिळाल्याने मृतदेह थेट डीडीसी बँकेत