अंगणवाडी सेविका / मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

उस्मानाबाद :- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प वाशी अंतर्गत अंगणवाडी सेविका /मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

          या भरती प्रक्रियेत खाली नमूद करण्यात आलेल्या पदासाठीचे आवेदनपत्र दिनांक 20 फेब्रुवारी ते  5 मार्च 2019 या कालावधीत अर्ज प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुटटीचे दिवस वगळून) स्वीकारले जाणार आहेत.         

विभाग-इंदापूर, गावाचे नाव-यशवंडी, अंगणवाडी सेविका  1 पद, विभाग पारगाव गाव- पांगरी, मदतनीस 1 पद, विभाग-पारा- गाव- पिंपळगाव (लि) मदतनीस 1 पद, विभाग- पारा -गाव -सारोळा (वा), मदतनीस, 1 पद विभाग-तेरखेडा–गाव- मसोबाचीवाडी मदतनीस 1 पद, विभाग-इंदापूर गाव-इंदापूर मदतनीस 1 पद,नियम ,अटी, शर्ती, शैक्षणिक पात्रता व अर्जासोबत जोडवयाची कागदपत्रासंबधी अधिक माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रा.प्रकल्प अधिकारी वाशी यांच्याशी संपर्क साधावा असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

admin

Read Previous

जांब येथे किरकोळ कारणावरून मारहाण

Read Next

मोबाईल चोरीची फिर्याद नोंदवून न घेणाऱ्या आनंदनगर पोलिसांना दणका