बनावट पोलीस गहाळ प्रमाणपत्र बनवुन फसवणूक

उस्मानाबाद :- दिनांक 07.02.2019 रोजी 15.00 वा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय , उस्मानाबाद येथे 1) मनोज प्रताप पवार रा.लोहारा (बु) 2) पठाण यांनी गाडी क्र. एम.एच. 25 ए.एल. 0079 या वाहनाच्या नोंदणी पुस्तकाची दुय्यम प्रत घेणेकरिता आवश्यक असलेले पोलीस गहाळ प्रमाणपत्र सादर करणेस सांगितले असता त्यांनी सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावट कागदपत्रावर शिक्के तयार करुन ते खरे असल्याचे भासवले त्यांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून वरिल आरोपीतांनी सदरचे कागदपत्र हे खोटे आहेत हे माहित असताना सुध्दा खरे आहेत असे भासवुन वाहन नोंदणी पुस्तकाची दुय्यम प्रत घेण्यासाठी उपयोगात आणले आहेत म्हणून युनुस महंमद सय्यद (मोटार वाहन निरीक्षक) उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद यांचे फिर्यादवरून 1) मनोज प्रताप पवार रा.लोहारा (बु) 2) पठाण यांचेविरुध्द दिनांक 14.02.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 420,468,471,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

admin

Read Previous

स्काऊट-गाईड मुळे मुलांचे व्यक्तिमत्व घडते – राणाजगजितसिंह

Read Next

उस्मानाबाद लाइव्ह : नव्या रंगात, नव्या ढंगात !