स्काऊट-गाईड मुळे मुलांचे व्यक्तिमत्व घडते – राणाजगजितसिंह

उस्मानाबाद – भारत स्काऊट आणि गाईडचा जिल्हा मेळावा दि.14 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे. या मेळाव्याच्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, भारत स्काऊट गाईडचे राज्य कोषाध्यक्ष बाबूराव हंगे, जिल्हा आयुक्त व जिल्हा परिषद सदस्य उषा सर्जे, जिल्‍हा संघटन आयुक्त जनार्दन इरले, सहायक संघटन आयुक्त अनुसया शिरसाट, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, सुधाकर आबदरे, बालाजी तांबे, बालाजी इतबारे, राजकुमार मेढेकर, राजेंद्र मडके, विभिषण रोडगे, सौदागर सर,कोषाध्यक्ष उदयसिंह पाटील हे उपस्थित होते.

आ.श्री. पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद यांच्या एकत्रित मदतीतून स्काऊट गाईड साठी एक सभागृह तयार करूया. तसेच स्व-निधी उभा करून जिल्ह्यातील सर्व शाळांमधून भारत स्काऊट गाईड करिता चांगली सुविधा निर्माण करूया.अशा प्रकारच्या मेळाव्यासाठी त्यांनी पुढील वर्षापासून जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 2 लाख रुपये वाढीव तरतूद करण्याची घोषणा केली .

उदघाटनपर मार्गदर्शन करताना आमदार विक्रम काळे यांनी सर्वप्रथम जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, पुस्तकी ज्ञानाबरोबरच एक आदर्श माणूस घडावा, शिस्त लागावी,जीवनभर शिस्तीचा उपयोग चांगले आयुष्य घडविण्यासाठी व्हावा, यासाठी स्काऊट गाईड ही चळवळ आहे. या चळवळीला बळकटी देण्यासाठी शासनाच्या भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, बोर्डाच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी 25 जादा गुणांची सवलत देण्यात यावी आणि ही चळवळ सर्व शाळांमध्ये पोहोचावी, यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन.

या मेळाव्याचे उदघाटन शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा संघटन आयुक्त जनार्दन इरले यांनी केले. आभार जिल्हा आयुक्त उषा सर्जे यांनी मानले. सूत्रसंचालन गोविंद केंद्रे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हयातील विविध शाळांमधून जवळपास 700 विद्यार्थी स्काऊट गाईड, शिक्षक, पालक उपस्थित होते.

admin

Read Previous

सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांना कारणे दाखवा नोटीस

Read Next

बनावट पोलीस गहाळ प्रमाणपत्र बनवुन फसवणूक