उस्मानाबाद लाइव्ह : नव्या रंगात, नव्या ढंगात !

डिजिटल मीडियात सदैव अग्रेसर असणाऱ्या उस्मानाबाद लाइव्हने आपल्या वेबसाईटचा लूक पुन्हा एकदा चेंज केला आहे. तसेच वेब ऍड्रेस .in ऐवजी पुन्हा एकदा .com केला आहे. जे नवे ते आम्हाला हवे असे उस्मानाबाद लाइव्हचे धोरण आहे. दर दोन वर्षाला उस्मानाबाद लाइव्हने लूक चेंज करून वेबसाईट अधिक युझर फ्रेंडली केली आहे.

महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात उस्मानाबाद हा सर्वात मागास जिल्हा. याच मागास जिल्ह्यातून दहा वर्षांपूर्वी उस्मानाबाद लाइव्ह हे उस्मानाबादचे पहिले न्यूज पोर्टल सुरु केलं. जेव्हा इंटरनेटची 2 G स्पीड होती, तेव्हा हे धाडस केलं होतं. तेव्हा आजच्यासारखे स्मार्ट फोन नव्हते. वेबसाईट फक्त कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर पाहावी लागत होती. तेव्हा अनेकांनी आमच्याबद्दल नाके मुरडली होती. आमच्या पत्रकारितेतील विरोधकांनी तर उस्मानाबाद लाइव्ह ही वेबसाईट कोण वाचतंय, अशी आवई उठवून निंदा नालस्ती केली होती. पण त्यांची तोंडे गप्प करण्याचे काम उस्मानाबाद लाइव्हने केलं आहे. आज तेच आमच्या वाटेवरून मागे चालत येत आहेत.

आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे.इंटरनेटची स्पीड 4 G झाली आहे. लवकरच 5 G होईल. प्रत्येक स्मार्ट फोनधारक आमचा वाचक झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १५ लाख आहे. किमान ३ लाख लोकांच्या हातात स्मार्ट फोन आहे. त्यातील किमान दोन लाख स्मार्ट फोनधारक आमचे हक्काचे वाचक आहेत.

सध्याचा जमाना हा डिजिटल मीडियाचा आहे. आज किती टक्के लोक सकाळी प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र वाचतात ? हा एक प्रश्नच आहे. आजची बातमी उद्या कश्याला ? आजची बातमी आज नव्हे आताच हे वाचकांना हवे आहे. तोच धागा पकडून उस्मानाबाद लाइव्हची वाटचाल आहे. उस्मानाबाद लाइव्हने वेबसाईट बरोबर स्वतंत्र अँप, युट्युब चॅनल, फेसबुक पेज सुरु केल्याने टेस्ट, इमेज आणि व्हिडीओ या सर्व डिजिटल माध्यमातून बातम्या वाचता आणि पाहता येतात.

अनेक अडचणींचा सामना करून उस्मानाबाद लाइव्ह वेबसाईट सुरू आहे. पत्रकारिता हा धंदा नसून धर्म आहे, हे ब्रीद आम्ही जोपासले आहे. उस्मानाबाद लाइव्हच्या सर्व डिजिटल माध्यमातून अनेक प्रकरणाचा भांडाफोड करून गोरगरीब, वंचीत, पीडित लोकांना न्याय मिळवून दिला आहे, तसेच गरजू व्यक्ती, विद्यार्थी यांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे.

उस्मानाबाद लाइव्हच्या वाटचालीत अनेक अडथळे आणि जीवघेणे संकटे आली, पण मदत करणारेही काही भेटले ! त्या सर्वांचे आभार ! वाचकांचे प्रेम असेच कायम राहील, ही अपेक्षा !

सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
www.osmanabadlive.com
मो. 9420477111

admin

Read Previous

बनावट पोलीस गहाळ प्रमाणपत्र बनवुन फसवणूक

Read Next

अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू