सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांना कारणे दाखवा नोटीस

उस्मानाबाद – उस्मानाबाद पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांना,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


तालुक्यातील दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट सरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली म्हणून ही बजावली नोटीस बजावण्यात आली आहे. 24 तासाच्या आत खुलासा न केल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याची  तंबीही  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्याने सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश तायडेयांचे धाबे दणाणले आहेत. 

आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी,  दाऊतपूर ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार उघडकीस आणला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

admin

Read Previous

होळी गावात हातभट्टी दारूची विक्री / महिलांचा ठिय्या

Read Next

स्काऊट-गाईड मुळे मुलांचे व्यक्तिमत्व घडते – राणाजगजितसिंह