बेरोजगारी वाढली; राष्ट्रवादीच्या युवकांनी तळले भजे !

उस्मानाबाद : वर्षाकाठी दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा करणाºया या सरकारच्या कालावधीत उलट रोजगार मोठ्या प्रमाणात घटला आहे़ रोजगार वाढीसाठी आखलेल्या विविध योजनांही पूर्णत: अपयशी ठरल्या़ त्यामुळे सुशिक्षित तरुणांवरही आता भजे तळण्याची वेळ आल्याचा आरोप करीत येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उपहासात्मक आंदोलन करुन लक्ष वेधले़

उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण हे कृषी आधारित आहे़ त्यामुळे मोठा रोजगार हा शेती व्यवसायातूनच निर्माण होतो़ मात्र, मागील काही वर्षांपासून अवर्षणाच्या स्थितीमुळे दुष्काळी स्थिती आहे़ शेती शाश्वत राहिली नसल्याने तरुण शेतकरीही इतर व्यवसायाकडे वळू लागले आहेत़ परंतु, त्यांना इतर कोणत्याही क्षेत्रात आजघडीला रोजगारच उपलब्ध राहिला नाही़ परिणामी, तरुण शेतकरीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत़ येथील मानव विकास निर्देशांकही अत्यंत खालावला आहे़ अशा स्थितीत शासनाने उस्मानाबाद जिल्ह्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मते आंदोलकांनी व्यक्त केली़ दरम्यान, येथील भौगोलिक स्थिती उद्योगांना पूरक अशीच आहे़ कौडगाव एमआयडीसीत १५०० एकर जागा उपलब्ध आहे़ उजनीचे पाणी आहे़ मंजूर सौर उर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून विजेची सोय होईल़ त्यामुळे याठिकाणी उद्योग उभारणी झाल्यास रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत़ तसेच लातूरला होऊ घातलेल्या रेल्वे कोच फॅक्टरीस आवश्यक असणारी उपकरणे, सुट्या भागांच्या निर्मितीचे प्रकल्पही येथे उभे केल्यास रोजगार मिळतील़ मात्र, सरकारने यासाठी कसलाही पुढाकार घेतला नाही़ रोजगार वाढविण्यासाठी म्हणून प्रधानमंत्री मुद्रा योजना, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्कील इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन अशा विविध योजनांच्या घोषणा मोठा गाजावाजाने केल्या़ मात्र, त्यांच्या अंमलबजावणीत सरकार पूर्णत: अपयशी ठरले़ परिणामी, रोजगार निर्मिती झाली नाही़ जीएसटी, नोटाबंदीमुळे अस्तित्वातील सुमारे १ कोटी १० लाख नोकºयाही गेल्या़ त्यामुळे बेरोजगारीत प्रचंड वाढ होऊन तरुण नैराश्येच्या गर्तेत ढकलले गेल्याचा आरोपही आंदोलकांनी केला़ या बाबी लक्षात घेऊन रोजगारासाठी आवश्यक पावले न उचलणाºया सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजे तळले़ तसेच चहाही बनवून प्रतिकात्मक मोदी व शहा यांच्या हस्ते नागरिकांना वाटप करण्यात आले़ यावेळी सरकारविरोधी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी आदी उपस्थित होते़

यावेळी जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष सुर्यकांत सांडसे, ओबीसी जिल्हाध्यक्ष, लक्ष्मण माने, सामाजिक न्याय शहर जिल्हाध्यक्ष दत्ता पेठे, वक्ता सेल जिल्हाध्यक्ष सुशिल शेळके, जि. प. सदस्य संदीप मडके, तालुकाध्यक्ष आनंद कंदले, सतीश सोन्ने, बालाजी मोटे धनंजय पाटील, सुनिल काकडे नगर सेवक गणेश खोचरे, अभय इंगळे, माणिक बनसोडे, बाबा मुजावर, बबलु शेख, डॉ. चंद्रजीत जाधव, संदीप साळुंके, कैलास काकडे, सनी पवार महादेव माळी, अभिजीत कदम, आप्पा पवार, शहराध्यक्ष राज निकम, सचिन लोंढे, स्वानंद पाटील, ओम नाईकवाडी, सलमान शेख, गणेश एडके, रत्नदिप भोसले, गणेश पवार, विशाल पाटील, विशाल वाघमारे, अमोल राजेनिंबाळकर, दुर्गेश साळुंके, अन्वर शेख, दिपक पवार, पं. स. सदस्य नामदेव भाग्यवंत, अमरसिंह ढोबळे, शंकर मोरे, महेश गंगणे, पुष्पकांत मळाळे, किशोर पवार, गफुर शेख, सिद्दीकी तांबोळी, सुरज शेरकर, संभाजी फरतडे, निरंजन जगदाळे, अक्षय कांबळे, इस्माईल सय्यद, सलमान तांबोळी, शेख शाहरुख, धनंजय जगताप, आनंद मोरे, मुक्तार शेख, जनकराज सुर्यवशी, जाधव मयुर, संभाजी पाटील, शिवाजी गजगे, गौतम गजगे, मयुर शेरकर, सुनिल पलंगे, अजीत चौधरी, विशाल पवार, हिम्मत भोसले, सुधीर भोसले, अमोल चव्हाण, सुरजीत राऊत, अशीष मोरे, गणेश नन्नवरे, वसंत सोनटक्के, मयुर जाधव, अक्षय कांबळे, शंकर मोरे, दिपक पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी होते.

admin

Read Previous

राजवर्धन हंगरगेकर याची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

Read Next

होळी गावात हातभट्टी दारूची विक्री / महिलांचा ठिय्या