हिरकणी महोत्सवचा समारोप

उस्मानाबाद  – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद व लेडीज क्लब उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आद्या हिरकणी महोत्सव जिल्हास्तरिय विक्री व प्रदर्शन- २०१९ या ५ दिवसीय प्रदर्शनाचा समारोप कार्यक्रम दिनांक ०८ फेब्रुवारी २०१९ रोजी संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, तर जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री.अनुप शेंगुलवार, मुख्यमंत्री फेलो पल्लवी सांगळे, आणि प्रियांका कारंडे यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ. बलवीर मुंडे यांनी केले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील महिलांनी या ५ दिवसीय प्रदर्शनात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवलं आहे. यापुढेही अशाच विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वयंसहायता गटातील महिलांना उपजीविका वृद्धी साठी आम्ही प्रयत्नरत राहु असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी महिला स्वयंपूर्ण होत असताना पाहून आनंद होतोय आणि या सर्व महिला भविष्यातील मोठ्या उद्योजिका आहेत असं मत व्यक्त केल. तसेच या कार्यक्रमादरम्यान दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना तसेच रोजगार मेळाव्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक विपणन व आर्थिक समावेशन श्री.समाधान जोगदंड यांनी दिली. या प्रदर्शनात एकुण १०७ दुकानांच्या माध्यमातुन पाच दिवसात एकुण ११ लाख ३६ हजार ९१५ इतकी कमाई झाली आहे अशी माहिती आयोजकांनी दिली. याप्रसंगी उत्कृष्ट व्यवसाय केलेल्या लक्ष्मी आई स्वयंसहायता गट नाईकनगर, मुरूम तालुका उमरगा या गटाला प्रथम, आदर्श स्वयंसहायता गट येरमाळा तालुका कळंब या गटाला द्वितीय व राजमाता महिला स्वयंसहायता गट कन्हेरवाडी तालुका कळंब या गटाला तृतीय क्रमांकाचे व इतर गटांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी तर आभार जिल्हा समनवयक कृतीसंगम गोरक्षनाथ भांगे यांनी मानले.

admin

Read Previous

शेतमजुराचा मुलगा झाला सी.ए. !

Read Next

होळी गावाची अवैध दारू विक्रीमुळे होळी !