सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वे मार्ग मार्गी लागेल ?

सोलापूर ते उस्मानाबाद व्हाया तुळजापूर रेल्वे मार्गास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. गेली दोन दशके तुळजापूर आणि उस्मानाबादकर ज्या महत्वकांक्षी रेल्वे प्रकल्पाची वाट पाहत होते तो क्षण अखेर जवळ आला आहे. मोदींच्या घोषणेमुळे उस्मानाबादकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हा मार्ग आमच्यामुळे मार्गी लागला असा डांगोरा कोणीही पिटोत, पण हा मार्ग लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे आणि त्याचे काम सुरू झाले पाहिजे, अशी उस्मानाबादकरांची एकमुखी मागणी आहे
या रेल्वे मार्गाचे अनेक वेळा सर्व्हेक्षण झाले, मात्र निधी मंजूर झाला नव्हता.मोदींनी घोषणा करताना 200 कोटी बजेट मंजूर केल्याचे सांगितले जात आहे.
सोलापूर ते उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग 80 किलोमीटर लांबीचा असून 905 कोटी खर्च अपेक्षित आहे, हा मार्ग लवकर मार्गी न लागल्यास बजेटमध्ये आणखी वाढ करावी लागणार आहे.
या मार्गाचे काम हाती घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद ते तुळजापूर हे काम हाती घेतले पाहिजे. कारण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे भागातील अनेक भाविक येत असतात. त्यांना हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबईहुन थेट तुळजापूरला जाता येईल. सध्या भाविकांना उस्मानाबादला येवून बसने तुळजापूरला जावे लागते.
मोदीच्या घोषणेबद्दल उस्मानाबादकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लबाडाचे अवतन जेवल्याशिवाय खरे नाही असे काही जण म्हणत आहेत तर मोदी नक्की हे काम करणार असा काहींनी विश्वास आहे.
पाहू या हे सरकार नेमके काय करते ?

तुम्हाला काय वाटते ?
खरंच हा मार्ग आता तरी पूर्ण होईल की, उस्मानाबादकरांचे दिव्यस्वप्नच राहणार ?

#सुनील ढेपे

admin

Read Previous

पोलीस स्टेशन चकाचक… कारभार मात्र भंगार !

Read Next

एक तरी वारी अनुभवावी