शेतमजुराचा मुलगा झाला सी.ए. !

उस्मानाबाद – तालुक्यातील नितळी येथील एका शेतमजुराचा मुलगा सी.ए. झाला आहे. गोपाळ जगताप असं याचं नाव. गोपाळ 10 वर्षाचा असताना वडील अनुरथ वारले, त्यानंतर आई इंदूबाई जगताप यांनी, शेतमजुरी करून गोपाळचा शिक्षणाचा खर्च केला,

गोपाळला तीन बहिणी, त्यांच्या पालन पोषण आणि लग्नाचा खर्च करून गोपाळचा शिक्षणाचा खर्च भागवणे हे इंदूमती जगताप यांच्यासमोर आव्हान होते, तरी ही माता डगमगली नाही तर गोपाळ हा आईचे कष्ट जाणून होता.
गोपाळचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, त्यानंतर अकरावी आणि बारावी कॉमर्स शिक्षण उस्मानाबादच्या आर.पी. कॉलेजमध्ये झाले, त्यानंतर सी. ए. पदवीसाठी गोपाळने सन 2010 मध्ये पुणे गाठलं. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने सी.ए. होण्याचे स्वप्न साकार केलं.
पती वारल्यानंतर न डगमगता मुलांचे पालन पोषण करणाऱ्या माता इंदूमती यांना सलाम आणि आईचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून सी.ए. होणाऱ्या गोपाळचे उस्मानाबाद लाइव्हच्या वतीने खास अभिनंदन !
गोपाळ जगताप याच्या या उत्तुंग यशाबद्दल गावचे सरपंच बबन सुरवसे, मुख्याध्यापक पी.बी. आडसूळ यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करून गोपाळच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

admin

Read Previous

लोकसभा निवडणूक : संभाव्य उमेदवार कोण राहणार ?

Read Next

हिरकणी महोत्सवचा समारोप