विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्ष कैद व दंडाची शिक्षा

उस्मानाबाद :- दिनांक 13.11.2017 रोजी ते दिनांक 19.11.2017 वा चे दरम्यान देशमुख हॉस्पीटल जवळ उस्मानाबाद येथे अमोल नामदेव अंकुशराव वय 31 वर्षे, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद याने 5 वर्षाची अल्पवयीन मुलीचा कोणी जवळ नसल्याचा फायदा घेवुन लैंगीक अत्याचार केला होता. म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 20.11.2017 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भारतीय दंड विधान कलम 354(अ), सह बा.लै.अ.प्र. कायदयाचे कलम 4,8 प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक के एस ढाकणे पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) यांनी केला सदरची केस मा. श्रीमती रॉय मॅडम तदर्थ सत्र न्यायालय 1, उस्मानाबाद यांचे न्यायालयात चालली. यातील आरोपीने सदरचे कृत केल्याचे निष्पण झाल्याने मा. न्यायालयाने आरोपी अमोल नामदेव अंकुशराव यास दिनांक 31.01.2019 रोजी 10 वर्षे कैद व 18,000/- रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्हयाचा तपास म.पोउपनिरी के एस ढाकणे यांनी चांगल्या प्रकारे केल्या बद्दल त्यांचे श्री आर राजा पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांनी अभिनंदन केले आहे.

admin

Read Previous

पत्नी पळून गेल्याने दोन मुलांसह पतीची आत्महत्या

Read Next

टीव्ही पाहणे झाले महाग !