मौजे गोविंदपुर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शिराढोण :- दिनांक 01/02/2019 रोजी दुपारी 03.30 वा. सु. पिडीत अल्पवयीन मुलगी ही शाळेतुन घरी एकटी जात असताना गोविंदपुर ते पारधी पिडी जाणारे रस्त्यावर आरोपी शंकर अमृत मुंडे रा. गोविंदपुर ता. कळंब जि. उस्मानाबाद याने पिडीत अल्पवयीन मुलीची अंगावरील ओढणी ओढुन तिस पैशाचे व मोबाईलचे आमीष दाखवुन तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन छुपा पाठलाग केला. व सदरची घटना सांगीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व पिडीत अल्पवयीन मुलीचे वडीलांना फोन करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन पिडीत अल्पवयीन मुलीचे फिर्यादवरुन शंकर अमृत मुंडे याचे विरुध्द दिनांक 08.02.19 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे भादंविचे कलम 354, 354(अ),354(ड), 504, 506, 507 सह बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम कलम 8,12 सह अ.जा.ज.अ.प्र. कायदयाचे कलम 3(1)(डब्ल्यु),3(2) (व्हीए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

admin

Read Previous

वृद्ध आई – वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या निर्देयी मुलाविरुध्द गुन्हा दाखल

Read Next

भापकर गेले, केंद्रेकर आले