बकरी ईदच्या सणासाठी जात असताना अभियंत्यांचा मृत्यू

उस्मानाबाद  – तालुक्यातील येडशी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या  स्विफ्ट डिझायर कारला समोरून येणाऱ्या बसने धडक दिल्याने  अभियंत्याचा मृत्यू झाला.  इकबाल जमाल शेख, असे  त्यांचे नाव असून, ते बीड जिल्ह्यातील आष्टी येथे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदावर कार्यरत होते. बकरी ईदच्या सणासाठी ते कारने लातूरकडे निघाले होते.

पुणे-लातूर राज्य मार्गावर येडशी जवळील कळंब रोड फाट्याजवळ मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. कळंबहून कळंब आगाराची बस (एम.एच ०७ सी ७४४६) येडशीकडे येत होती. या दरम्यान येडशीकडून स्विफ्ट डिझायर कारने (एम.एच.२३ एडी ५७) अभियंता इकबाल जमाल शेख (वय ५१, मु. धसवाडी पो. उजनी, ता.अंबाजोगाई, जिल्हा बीड) लातूरकडे जात होते. यावेळी एसटी आणि कारची समाेरासमोर धडक झाली. इकबाल शेख हे कार चालवत होते. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने येडशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. आरोग्य अधिकारी डाॅ. श्रीधर गीरी यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यास सांगितले. उपचारासाठी नेताना रस्त्यातच इकबाल शेख यांचा मृत्यू झाला.

admin

Read Previous

उस्मानाबाद येथे जबरी चोरी

Read Next

आंबी येथे जागेच्या कारणावरुन खुन गुन्हा नोंद