उस्मानाबाद येथे जबरी चोरी

उस्मानाबाद :- दिनांक 08.02.2019 रोजी 19.45 वा.सु. शरद भारत थावरे व मेघेश्वर सुभाष गायके दोघे रा. किल्ले धारुर ता. धारुर जि. बीड हे त्यांचे ट्रक क्र एम एच 20 ए टी 2647 ही घेवुन जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वर डिलक्स हॉटेलचे समोर उस्मानाबाद येथे ट्रक उभा करुन पुन्हा ट्रक चालु करुन पुढे निघणार तोच 1) आकाश प्रकाश राठोड 2) बालाजी केशव राठोड दोघे रा. जहागीरदारवाडी तांडा ता. जि. उस्मानाबाद व एक अनोळखी इसम यांनी ट्रकला मोटारसायकल आडवी लावुन दारु पिण्यास पैसे दे असे म्हणुन शिवीगाळ केली व दमदाटी करुन धक्काबुक्की केली. बालाजी राठोड याने हाताने बुक्कीने मारहान केली आकाश राठोड याने मेघेश्वर गायके याचे डोक्यात वीट मारुन जखमी केले व त्याचे हातातील 10,700/- रुपये जबरीने हिसकावुन घेतले व अनोळखी इसमाकडे दिले व तो मोटारसायकल घेवुन पळुन गेला व 1) आकाश प्रकाश राठोड 2) बालाजी केशव राठोड यांना पकडुन पोलीस स्टेशनला हजर केले म्हणुन शरद भारत थावरे यांचे फिर्यादवरुन 1) आकाश प्रकाश राठोड 2) बालाजी केशव राठोड व एक अनोळखी इसम यांचे विरुध्द दिनांक 09.02.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन 1) आकाश प्रकाश राठोड 2) बालाजी केशव राठोड यांना अटक करण्यात आली आहे.

admin

Read Previous

पोलीस शिपाई यांचे भरती प्रक्रियेत बदल

Read Next

बकरी ईदच्या सणासाठी जात असताना अभियंत्यांचा मृत्यू