आनंदनगर पोलिसांची खातेनिहाय चौकशी होणार

उस्मानाबाद – मोबाईल चोरीची फिर्याद नोंद करून न घेता तो अर्जच गहाळ करणाऱ्या आनंदनगर पोलिसांवर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती इंदुमती समिंद्रे यांची या प्रकरणी खातेनिहाय चौकशी होण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद येथील आरटीआय  कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांचा स्मार्ट फोन १७ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी चोरी गेला असता, त्यांनी या प्रकरणी आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दिली होती. मात्र  या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न करता गहाळ रजिस्टरला नोंद केली, इतकेच काय तर या संदर्भातील अर्जच गहाळ केला होता.

या प्रकरणी सुभेदार यांनी, पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली असता, त्यासाठी अप्पर  पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या चौकशीत  तत्कालीन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती इंदुमती समिंद्रे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कुलकर्णी आणि  समिंद्रे यांचे धाबे दणाणले आहे.

पोलीस अधीक्षक आर राजा यांनी या चौकशी अहवालाची दखल घेऊन तत्कालीन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती इंदुमती समिंद्रे यांची विभागीय तथा खातेनिहाय चौकशी प्रस्तावित केल्याचे समजते.

admin

Read Previous

टीव्ही पाहणे झाले महाग !

Read Next

पोलीस शिपाई यांचे भरती प्रक्रियेत बदल