आंबी येथे जागेच्या कारणावरुन खुन गुन्हा नोंद

आंबी :- दिनांक 02/04/2018 रोजी रात्री 11.00 ते 11.30 वा. चे दरम्यान 1) शहाजी पंडरीनाथ पटेकर 2) महारुद्र भाउराव गटकळ 3) गणेश बुवाजी गायकवाड 4) धम्मा पोपट गायकवाड 5) विशाल उत्तम शिंदे 6) बाबा दादाराव गायकवाड 7) सिध्देश्वर दादाराव गायकवाड 8) मारुती अभिमान उर्फ हौशेराव गायकवाड 9) विजय वसंत गटकळ 10) धनंजय नामदेव पुलवळे 11) दादाराव पाराजी गायकवाड 12) एक महिला सर्व रा. आंबी ता. भुम जिल्हा उस्मानाबाद यांनी संगनमत करुन फिर्यादी महिलेच्या राहते जागेच्या भांडणाचे कारणावरुन व फिर्यादी महिलेचा भाऊ अर्जुन तुकाराम गायकवाड हा यात्रेत ऑर्केस्ट्रा मध्ये गोंधळ घालतो या कारणावरुन यातील आरोपीतांनी अर्जुन तुकाराम गायकवाड यांना लाथा बुक्याने , पोटात, मानेवर, मांडीवर मारहान केल्याने जखमी होवुन मयत झाला आहे. म्हणुन फिर्यादी महिलेचे फिर्याद वरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 08.02.19 रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे भादंविचे कलम 302,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भुम यांचे सी आर पी सी कलम 156(3) प्रमाणे प्राप्त एम केस वरुन दाखल केला आहे.

admin

Read Previous

बकरी ईदच्या सणासाठी जात असताना अभियंत्यांचा मृत्यू

Read Next

वेगवेगळ्या घटनांत दोघांची आत्महत्या